स्वच्छ सर्वेक्षणात खडकी कॅन्टोन्मेंट पाचव्या स्थानावर
खडकी : प्रतिनिधी
भारत सरकारतर्फे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २०२४ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा केंद्रसरकरने घेतली होती यामध्ये ३८०० शहर आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड सहभागी झाले होते. स्पर्धा ही स्वच्छता या विषयावर आधारित होती या स्पर्धेत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला पाचवा क्रमांक मिळाला असून सार्वजनिक शौचालयांची नियमित स्वच्छता, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन आदी चे व्यवस्थित रित्या व्यवस्थापन केल्यामुळे बोर्डाला त्याबद्दल बोर्डाला ओडीएफ आणि जीएफसी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. खडकी बोर्डाने स्वछ तेबद्दल देशासमोर एक मोठा आदर्श निर्माण केला आहे.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण, कचऱ्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन, नागरीकांमध्ये जनजागृती मोहीम. डिजिटल ट्रॅकिंग प्रणालीचा वापर , स्वच्छ सार्वजनिक शौचालयांची नव्याने उभारणी, या विषयांवर भर देऊन बोर्डाचे आरोग्य विभागाने काम केले यासाठी बोर्डाच्या कर्मचाऱ्यांचे व नागरिकांचे ही यात मोलाचे योगदान मिळाले. खडकी बोर्डाला मिळालेल्या यशामध्ये बोर्ड मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी लोहिया, आरोग्य अधीक्षक शिरीष पत्की, तसेच आरोग्य निरीक्षक, मुकादम व सफाई कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

