ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भोर तालुक्यात ग्रामसेवकाला १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक


भोर : भोर तालुक्यातील शिंद व गवडी गावांचे ग्रामसेवक महादेव नामदेव झालगुडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे भोर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका घरकुल लाभार्थ्याकडून घरकुल योजनेचा दुसरा हप्ता मंजूर करून देण्यासाठी ग्रामसेवकाने १५ हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. भोलवडे – शिंद रस्त्यावर ग्रामसेवक महादेव झालगुडे हे १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले.

 


शिवसंवाद

शिवसंवाद न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *