भोरमध्ये सकल मराठा समाजाच्या भोर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश!
शिवसंवाद प्रतिनिधी भोर : भोरच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड झाली असून, सकल मराठा समाज भोर तालुका अध्यक्ष संजय भाऊसाहेब भेलके (पाटील) यांनी आपल्या प्रमुख सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात (BJP) जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे भोर तालुक्यात भाजपची ताकद आणखी वाढली आहे.
संजय भाऊसाहेब भेलके (पाटील) यांच्यासह दिलीप किसन भेलके (पाटील), सुरज राजेंद्र भेलके (पाटील), सुनील भाऊसाहेब खाटपे, सयाजीराव पाटील, व पार्थ संजय भेलके पाटील यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला.
या सर्व पदाधिकाऱ्यांचे भाजपमध्ये उत्साहाने स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले. पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थितांनी त्यांचे सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी युवा नेते पृथ्वीराज थोपटे, उद्योजक विक्रम शेठ चव्हाण, राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक उत्तमराव थोपटे, सुभाषराव कोंढाळकर, भोर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत अण्णा मळेकर, सामाजिक कार्यकर्ते बजरंग आबा शिंदे, विश्वजीत चव्हाण, रवि कंक, भाजप पुणे जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस अमर बुदगुडे, यांच्यासह आप्पा मळेकर, महेश भेलके (पाटील), अभि भेलके (पाटील), जितेंद्र कंक, दीपक मांढरे, इंद्रजीत सुपेकर, सुनील खाटपे आदी मान्यवर उपस्थित होते.
भेलके (पाटील) आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे एक मोठा गट भाजपशी जोडला गेला आहे, ज्यामुळे येणाऱ्या काळात भोरच्या राजकारणावर निश्चितच परिणाम दिसून येईल.

शिवसंवाद न्युज
