राजकीय

के डी सोनवणे कामथडी भोंगवली गटातून जिल्हा परिषद लढविणार.चिरंजीव महादेव सोनवणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात.


शिवसंवाद प्रतिनिधी भोर : पुणे जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलं असून सर्वत्र त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याचे मा चेअरमन व प्रसिद्ध ठेकेदार (के डी ) किसन सोनवणे यांनी चिरंजीव महादेव सोनवणे यांना भोंगवली कामथडी जिल्हा परिषद गटासाठी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.याच संदर्भात सोनवणे यांच्या निगडे येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेत थेट भाजप पक्षाकडून जिल्हा परिषद उमेदवारी साठी दावा केला आहे.

भोर तालुक्यात इच्छुकांनी आपण आगामी निवडणुकीत इच्छुक असल्याची सोशल मीडिया माध्यमातून जाहिरात केली मात्र थेट पत्रकार परिषद घेत मी जिल्हा परिषद साठी माझ्या मुलाला महादेव सोनवणे याला उभं करणार असल्याचे किसन सोनवणे यांनी जाहीर केले. के डी सोनवणे पत्रकार परिषदेत संवाद साधत असताना म्हणले आज पर्यंत आम्हाला अनेक वेळा डावललं गेल आहे आता आम्ही माघार घेणार नाही आता काही झालं तरी ही निवडणूक आम्ही लढणार भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या सोबत चर्चा झाली आहे. आणि मला विश्वास आहे की ते आम्हाला भोंगवली कामथडी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची संधी देतील.

जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात आम्ही बैठक घेतली असता सर्वांनीच आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगितले आहे.आणि याच विश्वासावर ही निवडणूक लढवून आम्ही कामथडी भोंगवली जिल्हा परिषद वर भाजपचा झेंडा फडकणार असे देखील किसन सोनवणे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

 

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मी इच्छुक असून आज पर्यंत केलेल्या कामाची पोचपावती म्हणून माजी आमदार संग्राम थोपटे आणि भाजपाचे पदाधिकारी आम्हाला नक्कीच भोंगवली कामथडी गटात निवडणुकीसाठी उभे राहण्याची संधी देतील अशी अपेक्षा असल्याचे पत्रकार परिषदेत बोलताना इच्छुक उमेदवार महादेव सोनवणे यांनी सांगितले

भोर तालुक्यातील चुरशीची लढत असलेल्या भोंगवली कामथडी गटात भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषदेची उमेदवारी कोणाला देतील या कडे सर्व उमेदवार तसेच इतर इच्छुक उमेदवार आणि मतदारांचे लक्ष लागले आहे.

 


शिवसंवाद

शिवसंवाद न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *