राजकीय

भोंगवली–कामथडी गटात ‘राम–लक्ष्मणाची जोडी’ चर्चेत भाजपच्या उमेदवारांमुळे विकासाची नवी आशा


कापूरहोळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने भोंगवली–कामथडी गटात दिलेल्या नवीन उमेदवारीमुळे राजकीय वातावरण तापले असून, ‘राम–लक्ष्मणाची जोडी’ अशी जोरदार चर्चा सध्या जनतेत सुरू आहे.

पंचायत समितीमध्ये यापूर्वी उपसभापती म्हणून यशस्वी कामगिरी बजावलेले रोहन बाठे यांनी आपल्या गणात विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवला आहे. गरजू, सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी कायम पुढे असलेला लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख आहे.

त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेसाठी महेश टापरे यांना उमेदवारी दिल्याने पूर्व भागातील नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील प्रश्नांसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली असून, माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकामांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.

गरीब कुटुंबातील उमेदवारांना संधी देत संग्राम थोपटे यांनी तरुण नेतृत्वाला पुढे आणले असून, भोंगवली–कामथडी गटाला नव्या दमाचे शिलेदार दिल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

महेश टापरे आणि रोहन बाठे ही जोडी म्हणजे विकासासाठी सज्ज असलेली राम–लक्ष्मणाची जोडी असून, या जोडीमुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत भाजपचा झेंडा फडकणार आणि परिसरात विकासाची गंगा वाहणार, असा स्पष्ट विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


शिवसंवाद

शिवसंवाद न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *