माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या वाढदिवसानिमित्त भोंगवली-कामथडी गटात पर्यावरणपूरक उपक्रम संपन्न.
सारोळा : भोर पंचायत समितीचे माजी उपसभापती रोहन बाठे यांनी भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भोंगवली-कामथडी जिल्हा परिषद गटामध्ये विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. या स्तुत्य उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात भोंगवली व कामथडी गटातील बहुतांश शालेय विद्यार्थ्यांना कापडी पिशव्या व खाऊचे वाटप करण्यात आले.
प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत तब्बल ५००० कापडी पिशव्यांचे वाटप यशस्वीरित्या पूर्ण झाले असल्याची माहिती रोहन बाठे यांनी दिली.
यावेळी बोलताना रोहन बाठे म्हणाले की, “हा उपक्रम केवळ वाढदिवसापुरता मर्यादित नसून, यापुढेही भोंगवली कामथडी गटातील विद्यार्थी, तरुण वर्ग, शेतकरी आणि महिला बचत गटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्याने राबवणार आहोत.”
रोहन बाठे यांच्या या पर्यावरणस्नेही पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, विद्यार्थ्यांना मिळालेल्या या उपयुक्त भेटीमुळे पालकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.

शिवसंवाद न्युज
