राजकीय

भोर तालुक्यात ‘झोलर पप्पू’ची दहशत ! अधिकाऱ्यांची लूट, मित्रांशी गद्दारी; ग्रामस्थ त्रस्त.


भोर/सारोळा : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात सध्या एका विशिष्ट व्यक्तीची जोरदार चर्चा सुरू आहे, ज्याला ग्रामस्थ ‘झोलर पप्पू’ या नावाने ओळखतात. या व्यक्तीमुळे तालुक्यात एक दूषित आणि अशांत वातावरण निर्माण झाले असून, त्याने स्वतःला ‘समाजसेवक’ ही पदवी बहाल केली आहे, पण त्याच्या आजवरच्या कार्यकाळात एकही समाजोपयोगी काम झालेले नाही, असे बोलले जाते. त्याच्या या ‘झोलर’ वृत्तीमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ‘झोलर पप्पू’ याने आतापर्यंत अनेक शासकीय कार्यालयांत अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांचा वापर करून त्याने काही अधिकाऱ्यांना कागदपत्रांच्या कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक प्रकरणांमध्ये, नोकरी जाण्याच्या भीतीने अधिकाऱ्यांनी त्याचे तोंड बंद करण्यासाठी त्याला हवी असलेली मोठी रक्कम दिली आहे. लोकांच्या या भीतीचा फायदा घेत, हळूहळू त्याची मजल वाढत गेली आणि यातूनच ‘झोलर पप्पू’चा जन्म झाला.

 

या ‘झोलर पप्पू’चा भूतकाळही वादग्रस्त असल्याचे बोलले जाते. अनेक गैरप्रकरणे आणि महिलांशी गैरवर्तन केल्याबद्दल त्याला भर चौकात महिलांनी मारहाण केली असल्याचे आणि काही ठिकाणी चपलांचा प्रसादही मिळाला असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

 

अनेक प्रकरणांतून त्याच्या मित्रांनी त्याला बाहेर काढत वारंवार समजावले. मात्र, उपकाराची परतफेड करण्याऐवजी त्याने आपल्या एका मित्राला खोट्या गुन्ह्यात अडकवले आणि त्याच्या उपकाराची अशाप्रकारे फेड केली. त्याच्या सततच्या ‘झोल’ करण्याच्या सवयीमुळे एका संघटनेने त्याला लाथ मारून हकालपट्टी देखील केली आहे.

 

आपले पाप झाकण्यासाठी आणि समाजात ‘गॉडफादर’ निर्माण करण्यासाठी हा ‘झोलर पप्पू’ सध्या एका विशिष्ट राजकीय पक्षाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला कोणतेही आमंत्रण नसताना किंवा कोणीही बोलावले नसताना तो डुलत डुलत व्यासपीठावर कुठेतरी स्थान मिळवतो आणि जनमानसात फुशारक्या मारतो, असे ग्रामस्थ सांगतात.

 

या ‘झोलर पप्पू’ला वैतागलेल्या ग्रामस्थांनी त्याचा एक सविस्तर परिचय संदेश तयार केला आहे. त्यानुसार त्याला सेटलमेंट करणारा, लुटमार करणारा, प्रतिमा शून्य, टग्या आणि चरित्रहीन अशा अनेक कठोर उपमा दिल्या गेल्या आहेत. गावातच त्याची प्रतिमा शून्य असल्याने, त्याला बाहेर किती किंमत आहे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले ‘झोलर पप्पू’साठीचे हे तिरकस संदेश आहेत.

सध्या या व्यक्तीवर संविधानाने दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करून लोकांना त्रास दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाकडे कठोर मागणी केली आहे:

‘झोलर पप्पू’ कोण? याचा शोध घ्यावा.

आजपर्यंत शासकीय कार्यालयांत दाखल केलेल्या सर्व अर्जांची कसून चाचपणी करावी.

अर्ज दाखल झाल्यानंतर त्याच्या बँक खात्यात काही मोठी तफावत आढळते का, याची चौकशी करावी.

त्याचा नक्की व्यवसाय काय आहे, याचा तपास घ्यावा.

 

एक प्रकरणात आत्मदहनाचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या या ‘झोलर पप्पू’ला चांगलीच अद्दल घडली होती. त्याने केलेल्या कर्मांमुळे त्याला अनेक महिने पोलिसांचा पाहुणचार घ्यावा लागला होता. त्याची लाज न बाळगता हा ‘टग्या’ आता मी आतून (तुरुंगातून) प्रशिक्षण घेऊन आलो असून, मला काय करायचे याची समज आली आहे, अशा निर्लज्जपणे वल्गना करत आहे.

एकंदरीत, समाजासाठी घातक ठरणाऱ्या या ‘झोलर टग्या’ला लवकरच त्याच्या कर्माचे फळ मिळेल, यात तिळमात्र शंका नाही, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

क्रमशः

 


शिवसंवाद

शिवसंवाद न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *