राजकीय

भोरच्या राजकारणात ‘सेवाशुल्क’ आणि ‘खंडणी’चा नवा अध्याय; ‘पप्पू’ नामक ‘झोलर’च्या कारभाराने नैतिकतेवर प्रश्नचिन्ह ?


भूतकाळ चरित्रहीन… आजचा ‘झोलर’ – सत्ता, सौदे आणि स्वार्थाचा खेळ!

‘सेटलमेंट’चा दलाल; नवा ‘लापाट’ नेता, जुन्याच ‘लफड्यांचा’ वारसदार!

 

सारोळा : भोर तालुक्याच्या राजकारणात सध्या एका अनोख्या आणि वादग्रस्त झोलर’ची जोरदार चर्चा आहे. हा ‘झोलर’ कोणत्याही औपचारिक राजकीय पक्षाचा किंवा प्रशासकीय पदाचा सदस्य नसतानाही, त्याने स्थानिक राजकारणाला एका नव्या, धोकादायक वळणावर आणून ठेवले आहे. ‘भूतकाळ चरित्रहीन आणि आजचा झोलर’ अशी त्याची ओळख बनली असून, गावातील साध्या भोळ्या नागरिकांच्या समस्या आणि न्याय दानाची प्रक्रिया त्याने अक्षरशः ‘सेवाशुल्क’ आणि ‘सेटलमेंट’च्या तराजूत तोलण्यास सुरुवात केली आहे.

 

‘लफडेखोर’ ते ‘खंडणीखोर’ – या ‘पप्पू’चा ऐटीतील प्रवास

भूतकाळात ‘लफडेखोर’ म्हणून ओळखला जाणारा हा व्यक्ती, आज ‘समाजसेवक’ म्हणून मोठ्या दिमाखात वावरत आहे. त्याचे मुख्य शस्त्र बंदूक नसून, ग्रामपंचायत आणि शासकीय कार्यालयात अर्ज दाखल करणे आहे. त्याचे ध्येय समाजसेवा नसून, प्रत्येक प्रकरणात आर्थिक ‘सेटलमेंट’ साधणे अशी चर्चा आहे.

 

कोणत्याही पक्षाचे अधिकृत सदस्यत्व नसतानाही, हा ‘झोलर’ नेता सत्तेतील आणि विरोधी अशा दोन्ही बाजूच्या नेत्यांशी सलोखा राखतो. गरजेनुसार, तो सत्ताधारी पक्षाकडून आर्थिक लाभ घेतो आणि विरोधी पक्षावर अर्ज दाखल करण्याची धमकी देतो. या संपूर्ण गोंधळातून तो आपला फायदा साधतो आणि प्रकरणे ‘सेटलमेंट’च्या भाषेत निकाली काढतो.

 

‘पारदर्शकतेचा’ मुखवटा, आतमध्ये ‘लोभाचा’ चेहरा

या नेतृत्वाला गावातील नागरिक ‘मोठेपणाला हापापलेला पप्पू’ म्हणून ओळखतात. हा व्यक्ती प्रत्येक प्रकरणात न्याय नव्हे, तर ‘डील’ शोधतो. कोणी अर्ज घेऊन आल्यास तो कागदपत्रे घेतो, पण लगेच “हा अर्ज, पण बोलून घेऊ…” असे सांगून ‘सेटलमेंट’चा प्रस्ताव समोर ठेवतो.

 

गावागावात लोक उघडपणे बोलतात की, “याचं राजकारण म्हणजे सेटलमेंट! तो अर्ज टाकतो, पण ‘सेटलमेंट’ ला कायम तयार राहतो.

 

स्वतःला ‘भ्रष्टाचाराविरोधात’ जाहीर करणारा हा झोलर नेता, आतून पूर्णपणे लोभाने भरलेला असून, त्याचे भ्रष्टाचारावरचे ‘प्रेम’ हे ‘सेटलमेंट’मध्येच दडलेले आहे. कागदोपत्री प्रामाणिक असला तरी, तो मनातून ‘झोलर’च आहे.

या ‘झोलर’ नेतृत्वाने न्यायव्यवस्थेऐवजी ‘सत्तेच्या नाडीवर’ स्वतःचे स्थान पक्के केले आहे. कोणत्याही प्रकरणात त्याला नुसती माहिती नको असते, तर मोठी रक्कम, ओळख आणि दबावतंत्र वापरण्याची संधी हवी असते. लोकशाहीतील अधिकारांचा गैरवापर करून ‘लफड’ (गोंधळ/गैरव्यवहार) करण्याचे काम त्याने सुरू केले आहे.या ‘झोलर’च्या वाढत्या प्रभावामुळे, ग्रामीण भागातील राजकीय नैतिकता, न्यायदान प्रक्रिया आणि लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.


शिवसंवाद

शिवसंवाद न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *