भोरमध्ये भाजपची ताकत वाढली, पुण्यातील प्रचार मेळाव्यात मानसिंग धुमाळ यांच्या समवेत दिग्गजांचा पक्ष प्रवेश.
पुणे | प्रतिनिधी : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी पुणे येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यास महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे भिमराव आण्णा तापकीर, भाजप पुणे ग्रामीण (दक्षिण) जिल्हाध्यक्ष शेखरजी वढणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुणे महानगरातील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
यावेळी पुण्यातील रहिवासी नागरिकांशी थेट संवाद साधत भोर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
भोर तालुक्यातील भाजपचे अधिकृत उमेदवार
कारी–उत्रौली जि.प. गट : स्वरुपा संग्राम थोपटे
कारी पं.स. गण : गिता आनंदराव आंबवले
उत्रौली पं.स. गण : सुषमा विक्रम चव्हाण
भोलावडे–शिंद जि.प. गट : विठ्ठल दिनकर आवाळे
भोलावडे पं.स. गण : काळूराम गणपत मळेकर
शिंद पं.स. गण :मनिषा राहूल पारठे
वेळू–नसरापूर जि.प. गट : पोपट नारायण सुके
वेळू पं.स. गण : ज्ञानेश्वर सोपान पांगारे
नसरापूर पं.स. गण : अमोल बंडोपंत शिळीमकर
कामथडी–भोंगवली जि.प. गट : महेश निवृत्ती टापरे
भोंगवली पं.स. गण : रोहन दिलीप बाठे
कामथडी पं.स. गण : निता धनंजय इंगुळकर
गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत “कमळ” या चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन उपस्थित नेत्यांनी केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भोर पंचायत समितीचे माजी उपसभापती मानसिंग बाबा धुमाळ, वंदनाताई धुमाळ, रामदास जेधे, रोहिदास जेधे, मोहन जेधे, युवराज जेधे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला. या सर्वांचे भाजपकडून हार्दिक स्वागत करण्यात आले.
मेळाव्यास उपस्थित राहिलेल्या पुणे स्थित सर्व भोरकर बंधू-भगिनींचे यावेळी आयोजकांकडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

शिवसंवाद न्युज
