स्वाभिमानाच्या रणधुमाळीत चंद्रकांत बाठे – अक्षय सोनवणे ठाम! कार्यकर्त्यांचा उठाव
सारोळा : संपूर्ण आयुष्य पक्षसेवा आणि समाजसेवेसाठी झिजवलेल्या, जनतेच्या मनातील उमेदवार चंद्रकांत बाठे,अक्षय सोनवणे यांना डावलण्याचा निर्णय होताच भोंगवली–कामथडी गटात संतापाचा उद्रेक झाला आहे. जिल्हा परिषदेचे प्रमुख दावेदार असतानाही अचानक उमेदवारी नाकारण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि अन्यायाविरोधात थेट रणांगणात उतरण्याचा निर्धार करण्यात आला.
शेवटपर्यंत “उमेदवारी फायनल”चे स्वप्न दाखवत अचानक चित्र बदलले गेले. चित्रपटाचा नायक बदलल्यासारखा प्रकार घडताच कार्यकर्त्यांनी तातडीची बैठक घेतली आणि “आता गप्प बसायचं नाही” असा ठाम निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला. वर्षानुवर्षे साचलेली खदखद, दुजाभाव आणि घराणेशाहीचा कडेलोट कार्यकर्त्यांच्या बैठकीत उघड झाला.
“एकाच घरात दोन उमेदवारी मिळत असतील तर आम्ही कायम सतरंज्या उचलायच्या का?” हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जनतेच्या मनातील उमेदवार जाहीर करत — चंद्रकांत बाठे : जिल्हा परिषद (अपक्ष) अक्षय सोनवणे : पंचायत समिती (अपक्ष)
अशी ठाम घोषणा केली आहे. ही केवळ निवडणूक नाही; ही कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाची लढाई आहे. त्यामुळे भोंगवली–कामथडी गटातील कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक थेट निवडणूक मैदानात उतरले आहेत.
निवडणूक आता जनतेच्या न्यायालयात चालणार आहे. कोणताही पदभार नसतानाही पूर्व भागात आरोग्य उपक्रम, विनामूल्य शस्त्रक्रिया, शासकीय योजनांच्या माध्यमातून गरजूंची कामे, तरुणांसाठी सतत मदतीचा हात—चंद्रकांत बाठे यांच्या सामाजिक कामाचा ठसा सर्वत्र आहे. त्याच ताकदीवर आणि अक्षय सोनवणे यांच्या सक्रिय सहभागावर जनमत अपक्षांच्या बाजूने झुकणारच, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.
स्वाभिमानी जनता योग्य निर्णय घेईल आणि योग्य उमेदवार निवडेल, हे निश्चित! या लढाईत जनता मैदानात असल्याचे सर्व कार्यकर्ते बोलत आहे.

शिवसंवाद न्युज
