राजकीय

कामथडी पंचायत समिती गणातून मोनिका दशरथ जाधव निवडणूक रिंगणात,विजयाचा विश्वास


भोर : भोर तालुक्यातील कामथडी पंचायत समिती गणातून सामाजिक कार्यकर्त्या मोनिका दशरथ जाधव यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत त्यांनी राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांवर आणि जनतेने दाखवलेल्या विश्वासावरच ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मोनिका दशरथ जाधव यांनी आपल्या कार्यकाळात अनेक सामाजिक उपक्रम, विकासकामे आणि जनहिताच्या योजना प्रभावीपणे राबवत नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. याच कामाच्या जोरावर या निवडणुकीत विजय आपलाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, पंचायत समिती निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र कार्यरत असलेल्या पक्षाने कोणतीही पूर्वसूचना न देता उमेदवारी डावलण्यात आल्याने त्यांच्या बाबतीत अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. या अन्यायाविरोधात त्यांनी आवाज उठवला असून, या अन्यायाला मतदारच मतांच्या माध्यमातून न्याय देतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


शिवसंवाद

शिवसंवाद न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *