नसरापूर–वेळू गटात पोपटराव सुके यांच्या विजयाची चर्चा वाढली
नसरापूर : भोर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. नसरापूर–वेळू जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पोपटराव सुके यांची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
विरोधासाठी विरोध करणाऱ्या टीकांकडे दुर्लक्ष करत, आजपर्यंत नागरिकांसाठी केलेली वैयक्तिक कामे व विकासात्मक उपक्रम हाच आपला आधार असल्याचे सुके यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र आहे.
साधी राहणीमान, स्पष्ट भूमिका आणि उच्च विचारसरणी यामुळे पोपटराव सुके यांना जनतेतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांच्या नावाला पसंती मिळताना दिसत आहे.
नसरापूर–वेळू गटात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या या वातावरणामुळे आगामी काळात राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शिवसंवाद न्युज
