ताज्या घडामोडीशहर

भोर कापूरहोळ मार्गावरील रस्त्याच्या कामामुळे भोर शहराचा पाणीपुरवठा खंडित


भोर | प्रतिनिधी : भोर–कापूरहोळ मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान संबंधित कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे वारंवार भोर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही मुख्य पाण्याच्या लाईन फुटल्याने भोर शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

या गंभीर घटनेची दखल घेत भोर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तसेच भोर नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक यांनी घटनास्थळी भेट देत तीव्र संताप व्यक्त केला. संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजी कामकाजामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

नगरसेवकांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी करत रस्त्याचे व पाईपलाईन दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे,जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत भोर शहरातील सर्व भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा,तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी,अशी स्पष्ट भूमिका मांडली.

दरम्यान, भोर शहरातील नागरिकांमधूनही तीव्र संताप व्यक्त होत असून पाणी ही मूलभूत गरज असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


शिवसंवाद

शिवसंवाद न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *