राजकीय

भोरमध्ये शिवसेनेचे पहिले जनसंपर्क कार्यालय थाटात सुरू; आगामी निवडणुकीत भगवा फडकवण्याचा निर्धार!


भोर प्रतिनिधी : भोर तालुक्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने प्रथमच भव्य जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयामुळे शिवसैनिकांना आणि तालुक्यातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

या कार्यालयाचे उद्घाटन पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे आणि जिल्हा संघटक माऊली शिंदे यांच्या हस्ते उत्साही वातावरणात पार पडले. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जिल्हाप्रमुख भेगडे यांच्या हस्ते अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली, ज्यामुळे संघटनेला तालुक्यात नवी ऊर्जा मिळाली आहे.उद्घाटनानंतर उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना नेत्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठे विधान केले प्रकाश भेगडे (जिल्हाप्रमुख):म्हणाले “येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व शिवसैनिकांनी गट-तट विसरून जोमाने कामाला लागावे. जनसंपर्क वाढवून पक्ष अधिक मजबूत करावा.” “वेळू-नसरापूर गटातील शिवसेनेचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणणारच,” असा ठाम विश्वास माऊली शिंदे (जिल्हा संघटक) यांनी व्यक्त केला.दशरथ गोळे (पूर्व तालुकाप्रमुख)यांनी प्रास्ताविकात भोर तालुका पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला.भरतनाना साळुंके (पश्चिम तालुकाप्रमुख): त्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी माजी तालुकाप्रमुख अर्जुन चव्हाण,पूर्व तालुकाप्रमुख दशरथ गोळे, तालुकाप्रमुख पश्चिम भरतनाना साळुंके,कामगार सेना भोर तालुकाप्रमुख विजय भिलारे,युवा सेनाप्रमुख अनिकेत शिंदे तालुका,भोर शहरप्रमुख चंदन कोळसकर, समन्वयक शंकर जाधव, मुळशी तालुका शिव सहकार सेना अध्यक्ष ज्ञानेश्वरजी डफळ,युवासेना प्रसिद्ध प्रमुख संदीप आमले देवकर, युवा नेते महेंद्र भोरडे,उपतालुकाप्रमुख एकनाथ तावरे,उपतालुकाप्रमुख निलेश मुजुमले,विभाग प्रमुख चंद्रकांत इंगुळकर,विकास बांदल, मा.उपतालुकाप्रमुख नारायण वीर,शाखाप्रमुख विलास गोळे पंडित खाटपे , नथुराम दिघे,लक्ष्मण मस्के, वाटकर मामा,आकाश दानवले शैलेश जाधव, ज्ञानोबा ढमाळ, दीपक धामुणसे,सागर कोंडे,राजेंद्र काटकर,केशव शेटे,सचिन चुनाडे,किरण पवार,केशव साळेकर, नथु राठवडे आणि इतर ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते.


शिवसंवाद

शिवसंवाद न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *